खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी प्राप्त

परभणी – या वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५५२ गावांतील २ लाख ५२ हजार ४४१ शेतकऱ्यांच्या १ लाख ७९ हजार ४४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचं दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२२ कोटी ६७ लाख ६५ हजार रुपये निधीची मागणी केलेली होती. मात्र, ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपयेच निधी प्राप्त झाला आहे. तो नऊ तालुक्यांना वितरित करण्यात आला, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टरवर पेरणी झालेली होती. ऑगस्ट महिन्यात मूग, उडदाची पिके ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सततचा पाऊस तसेच ३६ मंडळांत झालेली अतिवृष्टी, यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, बागायती, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे पंचनामे अंतिम करण्यात आले आहे. त्यानंतरही परभणी, सेलू, पाथरी तालुक्यातील नुकसान क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार ९९८ हेक्टरवरील जिराईत, बागायती, फळपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान जिराईत पिकांचे झाले. राज्य आपत्ती निवारण बलाच्या निकषानुसार शेती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये, तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये, वाढीव दराने शेती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ३ हजार २०० रुपये, तर बागायती पिकांसाठी ७ हजार रुपये मदत देण्यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपये एवढी निधी देण्यात आली असल्याचं महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –