आनंदाची बातमी! ठिबक अनुदानासाठी 191 कोटी रुपये मंजूर

ठिबक सिंचन

ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरतात. ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.या पद्धतीत,जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी,जमिनीच्या निरनिराळ्या प्रकारच्या जलधारणा शक्ती, वाफसा, तसेच पाणी जिरण्याचा व जमिनीच्या पोकळीतून वाहण्याचा वेग इ. भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.

निरोगी राहण्यासाठी प्लास्टिकऐवजी वापरा ‘या’ इको फ्रेंडली बॉटल्स

महाराष्ट्रत राज्यातील दोन लाख 13 हजार 755 शेतकऱ्यांचे ठिबक अनुदानाचे अर्ज हे मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर केलेल्या अर्जांपैकी एक लाख तीन हजार 821 शेतकऱ्यांना 250 कोटींचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी केली तक्रार ; बायोमेट्रिक अंगठे न आल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित

आता राहिलेल्या एक लाख दहा हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकतेच 191 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच हे अनुदान शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून वितरित करण्याची कार्यवाही सुरु होणार आहे.

पपईची बाग अवकाळी पावसात पुरती उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याला तब्बल ५ लाख रुपयाचा फटका !

2019-20 मध्ये अनुदानाच्या प्रतीक्षेतील एक लाख 10 हजार शेतकऱ्यांसाठी 170 कोटी रुपयांची गरज असून सरकारने मंजूर केलेल्या 191 कोटीतून संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जाणून घ्या काय आहेत ठिबक सिंचनाचे फायदे….

नव्या अर्जाची तारीख निश्‍चित नाही. त्यामुळे अनुदानासाठी अर्ज कधीपासून करायचे, याचा मुहूर्त ठरलेला नाही. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने पुढील हप्ता कधीपर्यंत मिळेल हे निश्‍चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधीपासून अर्ज करायचे हे ठरवले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

आदित्य ठाकरेंच्या हस्ते माहुलमधील प्रदुषणग्रस्त भागातील कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप

सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती