खुशखबर! जिल्ह्यातील शाळा ‘या’ दिवसापासून होणार सुरु

शाळा

औरंगाबाद – राज्य शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरु करण्यास अनुमती दिलेली आहे. त्यानुसार मनपा हद्दीतील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन सुरु करावेत, असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मनपा शाळेतील १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाचा धोका टळला आहे.

ऑफलाइन शाळा सुरु झाल्यानंतर मुलांची उपस्थिती ऐच्छिक असेल. शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येण्याची जबरदस्ती करू नये. दरम्यान, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती हीच पालकांची संमती समजून त्याला वर्गात बसवावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात अशासकीय, खासगी, शासकीय, इंग्रजी माध्यमाच्या एकूण ८५० शाळा आहेत. या ठिकाणी आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या १ लाख ९ हजार ६३३ एवढी आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील आठवी ते १२ वीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहेत.

शाळा सुरु करण्याबाबत मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी नियमावली जारी केली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये आयुक्त तथा प्रशासक हे समितीचे अध्यक्ष; तर उपायुक्त तथा विभागप्रमुख, सर्व वाॅर्ड अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी सदस्य असतील. शाळा सुरु करण्यासाठी ४८ तासांपूर्वी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, खासगी वाहन चालक, रिक्षाचालकांना दोन्ही डोस आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मध्यंतराची सुटी न देता वर्गातच अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलवावे. हि नियमावली आहे.

महत्वाच्या बातम्या –