खुशखबर! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार

शाळा

मुंबई – कोरोनामुळे राज्यातील शाळा खूप दिवसापासून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अनलॉकची प्रक्रिया सूरू केली आहे. मात्र, अद्यापही शाळा, महाविद्यालये बंदच राहणार असल्याचं दिसून येत होत. पण आता शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यात शाळा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे की २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहेत.

दरम्यान, इयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या –