चांगली बातमी; कृषी विद्यापीठातील रिक्त पदे लवकरच भरणार

कृषी विद्यापीठातील रिक्त पदे

पुणे – वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्ले १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. शेती क्षत्राशी निगडीत सर्व विभागांचा त्यात समावेश करुन ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली.

सन १९०७ पर्यंत कृषि व भुमी अभिलेख ही खाती एकत्रितरित्या कार्यरत होती. सन १९१५-१६ मधे तत्कालीन कृषि संचालक श्रीयुत किटींग यांनी जमिनीची धुप थांबवण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे आशादायक निष्कर्ष आल्यानंतर सन १९२२ पासुन मृद संधारणाची कामे सुरु केली. स्वातंत्र्योत्तर काळातील हरीतक्रांती पूर्वकाळ म्हणजे सन १९५० ते १९६५. या टप्यात शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या. परंतु या योजनांचे काम बघण्यासाठी काही पदे भरावी लागलीत. आता सध्याच्या काळात तर कृषी विभाग व कृषी परिषदेअंतर्गत अनेक पदे आहेत की जे हे सर्व काम पाहतात.

कृषी विभाग व कृषी परिषदेअंतर्गत येणाऱ्या चारही कृषी विद्यापीठात मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणार आहेत. कृषी विद्यापीठामध्ये रिक्त पदे असल्याने कामास विलंब होत असे. यावर तोडगा म्हणून लवकरच निर्णय घेण्यात येणार असून टप्याटप्याने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

मंत्री दादा भुसे म्हणाले, राज्यातील कृषी विभाग व कृषी विद्यापीठातील रिक्त जागांचा विषय हा उपस्थित होत आहे. याबाबत सरकारने आधीच सूचना दिलेल्या असल्याने त्यामधील रिक्त पदांमध्ये एकूण असलेल्या ५० टक्के रिक्त पदे हे सरळ सेवेने टप्याटप्याने, तर उर्वरित ५० टक्के रिक्त पदे हे उपलब्ध होणाऱ्या कार्यालयीन खर्चातून कंत्राटी पद्धतीने भरण्याचे निर्देश आहेत. तसेच मागील महिन्यात तीन संचालकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे उर्वरित संचालकांनाची पदे भरण्यात येतील.

महत्वाच्या बातम्या –