कापसाच्या अनुदानासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने केले रस्ता रोको आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा–  गुजरात राज्यात कापसाला प्रतिक्विंटल 500/- रुपये अनुदान दिलं जातं मग महाराष्ट्रातही तसेच अनुदान दया या मागणीसाठी बीड-परळी राज्यमार्गावर सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.गुजरात राज्यात शासनाने खरेदी केलेल्या कापसावर शेतकर्यांना प्रतिक्विंटल 500/- रुपये प्रमाणे सानुगृह अनुदान देण्यात येते.

म्हणुन त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुध्दा विविध ठिकाणी हमी भावाने कापुस खरेदी सुरु आहे.याठिकाणी देखील हि गुजरात राज्याच्या नियमाप्रमाणे कापसावर प्रतिक्विंटल 500/- रु.सानुगृह अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी जि.प.सदस्य जयसिंह सोंळके यांच्या नेतृत्वाखाली वडवणी येथील बीड-परळी रोड वरील छत्रपती शिवाजी चौक याठिकाणी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या रस्ता रोको आंदोलनात,औंदुबर सावंत,प्रा.सोमनाथरावजी बडे,बळीराम आजबे,भानुदास उजगरे,गणेश शिंदे,गंपु पवार,संदिपान खळगे आदि कार्यकर्त्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोनतास रस्ता रोको आंदोलन चालल्यामुळे राज्यमार्गावर वाहनाची मोठी भली रांग लागली होती.