बेरोजगारांना सुवर्णसंधी राज्यात होणार मेगाभरती

 टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजार जागांच्या नोकरभरतीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्यातील ३६ हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

३१ जुलै अखेरपर्यंत कृषी आणि ग्रामविकास,सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग,आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व पदांसाठी राज्यात एकाच दिवशी परीक्षा होणार आहेत.

पहिल्या टप्यात होणाऱ्या ३६ हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील ११ हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे,पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७ पदे, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मस्त्य व्यवसाय विकास विभागातील ९० पदांसह नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश आहे.