राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर

अवकाळी पावसाने नुकसान झाल्यावर तब्ब्ल चार महिन्यांनी राज्य शासनाने मदतीचा दुसरा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर केला आहे लवकरच आता तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या शेवटी राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यात पीकहानी झाली होती. राज्यात राज्यपाल राजवट होती तेव्हा तातडीची मदत म्हणून प्रति हेक्टर ८ हजार आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली होती. त्यानुसार निधी सर्व जिल्ह्यांना देण्यात आला होता.

नागपूर शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. नव्या सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला. त्यानुसार केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी त्याचा अहवाल केंद्राकडे सादर केला असून दुसऱ्या टप्प्यातील मदतीसाठी राज्य शासनाने ७५० कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. यापैकी पुणे विभागाला ५.१३ कोटी, औरंगाबाद विभागाला ४९० कोटी, कोकणाला २०.५४ कोटी, अमरावती विभागाला २१५ आणि नागपूर विभागाला १८.५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.