शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

कांदा

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे.
येवला बाजार समितीत गेल्या काही महिन्यांत १०,००० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा कांदा आता ७०० रुपयांवर आला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य, अंबादास बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची लागवड केली. कांद्यासह मका पीक पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याचे उत्पादन अवघ्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत घसरले. मागणीच्या तुलनेत पुरवठा काम होत असल्याने गेल्या दोन महिन्यात कांदा दर गगनाला भिडलेले होते. परंतु आता कांदा उत्पादनात कमालीची घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात फारसा लाभ पडला नाही.

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

आता नवीन कांदा निघालयला सुरु वात झाली आहे. त्यामुळे बाजारभाव २००० रुपयांच्या खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. येत्या काही दिवसात कांद्याची आवक वाढून दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य, अंबादास बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.