आता ‘या’ तारखेपासून सुरू होणार मका, ज्वारी, बाजरीची शासकीय खरेदी

मका, ज्वारी, बाजरीची शासकीय खरेदी

जळगाव –  राज्यात रब्बी हंगामात बाजरी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे बाजरी पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती चांगले आले आहे. मात्र खुल्या बाजारात व्यापारी “कोरोना’ चे कारणे दाखवुन शेतकऱ्यांची लूट करतात. हे व्यापारी धान्यांची कवडीमोल भावाने खरेदी करतात. तसेच   जिल्ह्यात शासकीय बाजरी, मका आणि ज्वारीची खरेदी ही येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या खरेदीसाठी लवकरच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया निश्‍चित खरेदी केंद्रात सुरू होणार आहे. यासाठी तब्बल १९ खरेदी केंद्र सुरू होणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी ही बंधनकारक आहे. त्यासाठी काही कागदपत्रांची गरज असणार आहे. त्यामध्ये संबंधित पिकाचा पेरा असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रांची गरज असणार आहे.

संकरित ज्वारीची २ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटल या दरात, मालदांडी ज्वारीची २ हजार ६४० रुपये, बाजरीची २ हजार १५० आणि मक्याची १ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत खरेदी केली जाईल.

यासाठी जळगाव – कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था, जळगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ. अमळनेर – अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ.पारोळा – पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघ. चोपडा – चोपडा तालुका शेतकरी सहकारी संघ. धरणगाव – अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ. एरंडोल – एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघ. ही केंद्रे खरेदीसाठी निश्‍चित केली आहेत.

महत्वाच्या बातम्या –