जालना – गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे तुघलकी फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती आ. माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी आज वंजार उम्रज, थार, जामवाडी आदी गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली त्यावेळी ही धक्कादायक बाब समोर आली.
जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली गारपीटीमुळे खराब झालेली द्राक्षे त्यांना दाखवली. प्रशासनाने अद्याप पंचनामे न केल्याचे निदर्शनास आणून दिले व मेलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करण्याच्या तलाठ्यांच्या तुघलकी फर्मानाची माहिती दिली. pic.twitter.com/GRY9AeZDAW
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 15, 2018
जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना या शिष्टमंडळाने शेती व फळबागांना भेटी दिल्या. तलाठ्यांनी पंचनामे न केल्यामुळे गावा-गावांत गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेली जनावरे अजून तशीच पडून असल्याचे या पाहणी दौऱ्यात दिसून आले. दरम्यान गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे तुघलकी फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला असून, हा पीडितांना मदतीपासून वंचित ठेवू पाहण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
गारपिटीमुळे पिकं उध्वस्त झाली आहेत. जनावरे दगावली आहेत. मदत हवी असेल तर मृत कोंबड्या, गाई, म्हशींना दवाखान्यात घेऊन या आणि शवविच्छेदन करून घ्या तरच मदत मिळेल असे सरकारी अधिकारी सांगत आहेत. या सरकारने शेतक-यांची क्रूर थट्टा चालवली आहे. pic.twitter.com/NZEht5xmFy
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 15, 2018
पाहणीनंतर काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. मोठ्या जनावरांचे शवविच्छेदन करणे समजू शकतो. पण एवढ्या मोठ्या नैसर्गिक संकटात मेलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करणे अव्यवहार्य असून,ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे खा. चव्हाण जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर म्हणाले. गारपीट, वादळ व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्रशासनाने पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेले वंजार उम्रज, जि. जालना येथील नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेतली. संकटात सापडलेल्या शिंदे कुटुंबाला १ लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. @INCMaharashtra pic.twitter.com/yImR270h7c
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 15, 2018