कापसाची उत्पादकता वाढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे – अतुल गणात्रा

अकोला-  शनिवारी (ता. १९) कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दि महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशन औरंगाबाद आणि दि महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असोसिएशन अकोला यांच्या सहकार्याने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी श्री. गणात्रा आणि ‘सीआयए’चे उपाध्यक्ष भुपेंद्रसिंग राजपाल हे उपस्थित होते. या परिषदेमध्ये श्री. गणात्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कापसाची उत्पादकता वाढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे, असे मत कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले की , महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर्जेदार कापसाची उत्पादकता कमी आहे. ती उत्पादकता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे, असे मत कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केले.

Loading...

श्री. गणात्रा म्हणाले, राज्यात टोकण पद्धतीने कापूस लागवडीचे प्रमाण हे अत्यंत कमी म्हणजे एक-दोन टक्के आहे. या भागातील कापसाची पाहणी केली असता टोकण पद्धतीने लागवड झालेल्या कापसाचे पीक चांगले आहे. त्या झाडांवर बोंडांचे प्रमाण जास्त दिसून आले. त्यामुळे राज्याची कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी टोकणपद्धत ही खूप फायदेशीर आहे.

सध्या देशात १.२७ कोटी हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. त्यामध्ये ४४ लाख हेक्टर लागवड महाराष्ट्रात आहे. त्यात सर्वाधिक लागवड महाराष्ट्रात आहे. पण राज्यात मराठवाड्यासारख्या भागात कापूस उत्पादन खूपच कमी आहे. संघटनेने शासनाला सिंचनाच्या सोयी वाढविण्यासाठी सूचना केली आहे.

दोन दिवसांच्या या कापूस परिषदेला जिनिंग, विक्रेते, निर्यातदार यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या भेटीगाठी आणि कापूस पीक पाहणीचा कार्यक्रम झाला.

महत्वाच्या बातम्या –

मतदार ओळखपत्र नसल्यास या ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य

जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग करणार – डॉ.अनिल बोंडे

पावसाचा पुन्हा मुक्काम ; सोमवारीही पावसाचा अंदाज

Loading...