मालेगाव – खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई, पिक विम्यासह विशेष अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात आलेल्या रकमा आठवड्याभरात शेतकऱ्यांना वाटप करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने पिक कर्ज वाटपाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते, याप्रसंगी उपमहापौर निलेश आहेर, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, सहायक निबंधक श्री.बदनाळे, अग्रणी बँकेचे प्रमुख श्री.शेखर जिल्हा बँकेचे प्रशासकीय व्यवस्थापक श्री.आरीफ, स्टेट बँकेचे व्यवस्थापक श्री.पांडे यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांना आज आर्थिक मदतीची गरज असून शासनामार्फत नुकसान भरपाई पोटी वितरित करण्यात आलेल्या रकमेवर कॅपिंग लावून शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीपासून वंचित ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब योग्य नसून पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीच्या रकमांचे वाटप करण्याच्या सूचना मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा बँकेच्या सर्व शाखा प्रमुखांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना याबाबत अवगत करण्याबाबतही निर्देशित केले.
तालुक्यात किमान 75 कोटीचे पिक कर्ज वाटप करावे
कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बळीराजाही प्रभावीत झाला आहे. या संकटकाळात येत्या हंगामासाठी त्याची आर्थिक मदतीची गरज ओळखून जिल्हा बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणात पिक कर्जाचे वाटप करण्याचे आवाहन करतांना यावर्षी तालुक्यात किमान 75 कोटीचे पिक कर्ज वितरित करण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.
ब–सत्ता प्रकारातील मिळकतींचा प्रश्न मार्गी लावा : मंत्री दादाजी भुसे
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करून ब-सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतरीत करण्यासाठी तालुक्यातील काही प्रकरणे मुल्यांकनाअभावी प्रलंबीत आहेत. शासनाच्या दरसुचीमधून सुटलेल्या मिळकतींचा समावेश होण्यासाठी पुढील पंधरा दिवसात कार्यवाही करण्याच्या सुचना मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या आहेत.
ब-सत्ता प्रकारातील प्रलंबीत प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, नगर भुमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधिक्षक भुमी अभिलेख भगवान शिंदे, सहायक दुय्यम निबंधक पी.एन.लहाने, एस.व्ही.वाघ, पी.डी.वाघचौरे, संजय दुसाणे, ॲड.सतिष कजवाडकर, बंडू माहेश्वरी आदि उपस्थित होते.
महसूल व नगर भुमापन विभागाने समन्वय साधत सातबारा उतारा व मिळकत पत्रिकेमध्ये मेळ घालून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे. सत्ता प्रकार बदलामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे, त्याच बरोबर नागरिकांचे देखील प्रलंबीत प्रश्न मार्गी लागणार असल्याने प्राधान्याने ही प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील कोरोना रुग्ण्संखेत झाली मोठी घट; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 एक लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूर
- ‘या’ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट!
- आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
- ‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश – अजित पवार यांची माहिती