केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – दादा भुसे

नाशिकसह विविध राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहेत. आठवडेभरात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर खाली आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. परिणामी, बाजारातील आवक वाढली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांना फॅक्सद्वारे सविस्तर निवेदन पाठविले आहे.

जाणून घ्या आवळ्याचे आरोग्यदायी फायदे

या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री भुसे यांनी केंद्राला साकडे घातले आहे. गेल्या वर्षी राज्यात दोन लाख 67 हजार हेक्टरवर कांदा लागवड करण्यात आली होती. या वर्षी रब्बीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन चार लाख 15 हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. उत्पादन वाढल्याने कांद्याची आवक वाढत आहे. कांद्याचे सरासरी बाजारभाव आठवड्यातच दीड हजारांच्या आसपास आले.लहान आकाराच्या कांद्याला केवळ पाचशे ते सातशे रुपये भाव मिळत आहे. भाव मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. निर्यातबंदी उठविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.