शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे – विधानसभा अध्यक्ष

विधानसभा अध्यक्ष

अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली.

श्री.पटोले म्हणाले, नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना वेळेवर पैसे देण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. राज्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. उर्वरित खरेदी केंद्रेही त्वरीत सुरु करावी, अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी नोडल एजन्सी व सबएजंट संस्थेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

धान खरेदीचे धोरण ठरविण्यासाठी विधीमंडळात चर्चा करणार – नाना पटोले

राज्यातील ‘नाफेड’ची बैठक लवकरच घेण्यात येईल. हरभरा खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून राज्यात लवकरच त्याची खरेदी सुरु होईल, असेही श्री.पटोले यांनी सांगितले. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनचे मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, नाफेड मुंबई ब्रँच मॅनेजर पुनीत सिंग, मार्केटींग फेडरेशनचे नागपूरचे संजय निचल, पणन विभागाचे अवर सचिव श्रीमती सुनंदा घड्याळे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या’- देवेंद्र फडणवीस

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्या – नाना पटोले