आरटी-पीसीआर (RT-PCR Test)चा दर ८०० रूपयांपर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई- कोरोनासाठीची आरटी-पीसीआर (RT-PCR Test) चाचणीचा दर सरकारने महाराष्ट्रात १२०० रुपयांपर्यंत आणलेला होता. जो देशातील सर्वांत कमी दर असून आता तो येत्या आठवड्याभरात ८०० रुपयांपर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आरटी-पीसीआरच्या (RT-PCR Test) किटची किंमत कमी झालेली या चाचणीचे दर देखील कमी होणार आहे. खासगी रुग्णालयात या आरटी-पीसीआर चाचणीचा दर कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल असे टोपे म्हणाले.

दरम्यान,राज्यात काल एका दिवसात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५ टक्के) आले आहेत. राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या –