केंद्र सरकारकडून शेतकरी, कामगारांवर मोठा अन्याय

अशोक चव्हाण

नांदेड – केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे कायदे करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासोबतच अपप्रचार करून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे चालू आहे. त्यांच्या अपप्रचाराला कार्यकर्त्यांनी चोख प्रत्युत्तर द्यावे, असे प्रतिपादन अशोक चव्हाण यांनी केले आहे.

नवामोंढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (ता. १४) माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात त्या वेळी अशोक चव्हाण बोलत होते. श्री. अशोक चव्हाण म्हणाले, की भाजप सरकार शेतकरी, कामगार व सर्व सामान्यांच्या विरोधात धोरण राबवीत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी व कामगार कायदे शेतकरी कामगारांना देशोधडीला लावणारे आहेत असे अशोक चव्हाण म्हणाले. तरीही भाजपकडून अपप्रचार पसरवत जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचं दावा अशोक चव्हाण यांचा आहे. अशा भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या  बातम्या –