कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठी संधी – सुभाष देसाई

सुभाष देसाई

कृषी आणि आरोग्य क्षेत्रात उद्योगाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या असून इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थेने यात पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

श्री. देसाई  म्हणाले, जागतिक स्तरावर आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.  यासाठी आले, हळद यासारख्या आरोग्यासाठी लाभकारक ठरू शकणाऱ्या कृषी उत्पादनांची मागणी वाढते आहे. यामुळे आरोग्य  क्षेत्रातही मोठी संधी निर्माण झाली आहे. या उत्पादनांची  निर्यात केल्यास शेतकरी आणि उद्योजक या दोघांसाठीही फायद्याचे ठरणार आहे.

इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सुरु करण्यात आलेले एंगेज महाराष्ट्र हे अभियान  यशस्वी होईल, यासाठी लागणारे सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –