मुंबई – देशातील कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तर आता पुन्हा देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 83 हजार 876 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात 895 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 2 हजार 874 रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या 11 लाख 8 हजार 938 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात १ लाख 99 हजार 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 79 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
- अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – अनिल परब
- कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत – नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
- ९० टक्के सबसिडीवर मागास वर्गीय व सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू
- आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज