बीड: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून नव्या बाधिताच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या चांगली असल्यान दिलासा मिळत आहे. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे ६०३ नवे रुग्ण निष्पन्न झाले तर ८६४ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार यांनी शिरूर तालुक्यातील गोमळवाडा येथे भेट देत पाहणी केली.
बुधवारी जिल्ह्यातील ५ हजार ५८८ संशयितांची कोरोना चाचणी केली. त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात ६०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांत अंबाजोगाई तालुका ५५, आष्टी ७९, बीड १६५, धारूर ३०, गेवराई ५८, केज ६५, माजलगाव ५०, परळी १२, पाटोदा २६, शिरूर ४९ आणि वडवणी तालुक्यातील १४ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान मागील २४ तासांत ८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८४ हजार २२० झाली असून पैकी ७६ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत १९३३ जणांचा बळी गेला असून सध्या ५ हजार ३८७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढच्या ४८ तासांत वादळी पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- कोरोना संकटकाळात बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल – हसन मुश्रीफ
- खरीप हंगामासाठी पीक कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा – यशोमती ठाकूर
- उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज