‘या’ जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुळा’ धरण

पुणे –  राज्यात मागील काही दिवसांपासून चांगलाच पाऊस सुरूच होता, तर पुणे जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्यामुळे पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणं काठोकाठ भरल्याने आता पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये सध्याच्या घडीला 99.94 टक्के पाणीसाठा आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.

खडकवासला धरण पूर्णपणे भरल्याने पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून 5136 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सकाळी 11 वाजल्यापासून तो कमी करुन 2568 क्युसेक्स वर आणण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुळशी धरणात सध्या 94% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी 2000-2300 क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –