‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद

‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद gatsheti

‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यात १६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचे समजते आहे. यासाठी ७१३ शेतकऱ्यांकडून १ हजार ६८० एकर क्षेत्रावर पिकांचे नियोजन आहे. जिल्ह्यातील गटशेतीअंतर्गत शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर अनुदानापोटी सुमारे १२ कोटींचा खर्च करण्यात येत आहे.

स्ट्रॉबेरी या फळांवर अधिक संशोधन करण्याची गरज – उद्धव ठाकरे

येत्या २ वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सिंचन, काढणी पश्चात तंत्रज्ञान,निविष्ठ प्रशिक्षण,कृषी माल प्रक्रिया,यांत्रिकीकरण व पणन इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरतात. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सामूहीक शेती, आधुनिक शेती पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत गटशेतीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

मुंबईच्या बाजार समितीत फळांचा राजा देवगड हापूस दाखल

या माध्यमातून ७१३ शेतकऱ्यांनी १६८० एकर क्षेत्रावर पिकांचे नियोजन केले आहे. यामध्ये बुलडाणा ४, मोताळा २, मलकापूर १, शेगाव १, खामगाव २, चिखली ३, नांदुरा १, संग्रामपूर १ तर लोणार तालुक्यातील एका शेतकरी गटाचा समावेश आहे. यासाठी एकुण २७ कोटी ५० लाखांचा खर्च आवश्यक आहे. यावर शेतकरी गटांना ५० अनुदान देण्यात आले आहे. अनुदानापोटी १२ कोटींचा खर्च शासनाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ प्रकल्पांपैकी बुलडाणा ४, चिखली १ व खामगाव तालुक्यातील १ अशा एकुण ६ गटांचे काम पूर्ण झाले आहे. इतर गटांची कामे सुरू असून ही कामेदेखील लवकरच पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.