कारले लागवड; व्यवस्थापन व पीक संरक्षण

कारले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आधार देणे गरजेचे आहे. जमिनीवर वेलीची वाढ चांगली होत नाही, फुटवे कमी येतात व फळांचा जमिनीशी संपर्क येऊन फळे सडण्याचे प्रमाण वाढते यामुळे कारल्याला मंडप व ताटी पद्धतीने आधार देतात.
? _*खत व्यवस्थापन*_ : लागवडीच्या वेळी 60 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. वेल 1 ते 1.5 महिन्याचा झाल्यावर 50 किलो नत्र द्यावे. माती परीक्षण अहवालानुसार खत मात्रेत बदल होऊ शकतो.
? _*पाणी व्यवस्थापन*_ : फळे लागण्याच्या काळात पाणी कमी पडल्यास फळे वेडीवाकडी होतात. अधिक पाणी दिल्यास वेली पिवळ्या पडतात. खरीप हंगामात पाऊस नसल्यास 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. तसेच उन्हाळी हंगामात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
? _*रोग*_
1) _*केवडा*_ (Downey mildew) : खरीपामध्ये उष्ण व दमट हवामानात या रोगाचे प्रमाण जास्त असते. या रोगामुळे पानाच्या खालच्या भागावर पिवळे डाग पडतात व ते वाढत जाऊन काळसर होतात आणि नंतर पान गळून जाते.
2) _*भुरी*_ (Powdery mildew) : भुरी हा रोग जुन्या पानावर प्रथम येतो. थोड्या थंडी आणि कोरड्या हवामानात पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाची पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ते पानाच्या पृष्ठभागावर सुद्धा पसरते. रोगाचे प्रमाण वाढले की पाने पिवळी होऊन गाळून पडतात.
? _*किडी*_
1) _*फळमाशी*_ (Fruit fly) : फळमाशी ही कीड खरीप व उन्हाळी हंगामात आढळते. खरीप हंगामात जास्त प्रादुर्भाव होतो. या किडीचे पतंग मादी कळीच्या त्वचेमध्ये अंडी घालतात. अंडी ऊबवून अळ्या फळांमध्ये वाढतात. त्या पूर्ण वाढल्या की फळाला भोक पाडून बाहेर येतात. फळमाशी लागलेली फळे वाकडी होतात व बरीचशी फळे त्याजागी पिकलेली दिसतात.
2) _*तांबडे भुंगेरे*_ (Beetles) : पीक रोपवस्थेत असताना ही कीड दिसून येते. हे नारंगी तांबड्या रंगाचे कीटक बी उगवून अंकुर आल्यावर त्यावर उपजिविका करतात. अळी व भुंगेरे दोन्ही पासून पिकास नुकसान होते. पानावर छिद्र दिसून येतात.
3) _*मावा*_ (Aphids) : मावा कीड प्रकारात पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात तसेच विष्णूजन्य रोगांचा प्रसार करतात.