मुंबई – आपल्या देशामध्ये चहा प्रेमी खूप आहेत. रोजचे ताणतणाव, दिवसाची सुरुवात करण्यासाठी म्हणून अनेक जण चहा पिणे पसंत करतात. पण जे डाएट करतात ते ग्रीन टी (Green tea) पितात. तर काहींना लेमन टी आवडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ग्रीन टी आणखी चविष्ट बनेल. तसेच, त्याचे फायदे देखील वाढतील
लिंबाचा रस ग्रीन टीच्या (Green tea) कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत.
आले – जेव्हा ग्रीन टीमध्ये आले मिसळले जाते, तेव्हा तिचे आरोग्यादायी फायदे आणखी वाढतात. वाढत्या प्रतिकारशक्तीबरोबरच आले कर्करोग रोखण्यासही मदत करते. हा चहा दमा, मधुमेह आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी देखील वापरला जातो.
पुदीना पाने आणि दालचिनी – ग्रीन- टीमध्ये पुदीनाची पाने टाकल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आपली भूक देखील कमी होते. यासारखे आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. तसेच, दालचिनी देखील वजन कमी करण्यास मदत करते.
मध – मध साखरेसाठी एक निरोगी पर्याय आहे. म्हणून, आपल्या ग्रीन टीमध्ये गोडवा आणण्यासाठी मध एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमच्या ग्रीन टीचा कडवटपणा कमी होतो. ग्रीन टीमधील अँटी ऑक्सिडेंट्स आणि मधातील मुबलक जीवनसत्त्वे व खनिजे एकत्र येऊन, हे एक सुपर हेल्दी ड्रिंक बनते. तसेच, मधयुक्त ग्रीन टी त्वचेच्या समस्या दूर करतो.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले तब्बल १५ लाख रुपये; मोदींनी पैसे दिले समजून बांधलं घर अन् समोर आली धक्कादायक माहिती
- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी – रेल्वेची ‘ही’ सेवा पुन्हा सुरु होणार
- चिंता वाढली! कोरोना नंतर आला आता ‘हा’ नवीन आजार, ‘या’ भागात सापडला पहिला रुग्ण
- उद्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार? जाणून घ्या
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. ९ फेब्रुवारी २०२२
- आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार का? याबाबत अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती