कमी पैश्यात शेतात शतावरी पिकवा आणि कमवा लाखो रुपये

शतावरी ही वनस्पती भारतात सुमारे दोन हजार वर्षांपासून परिचित आहे. शतावरीच्या सेवनाने माणसाची कार्यशक्ती शतगुणित होते. ही वनस्पती औषधीदृष्ट्या महत्वाची आहे. अनेक जातींपैकी अॅस्परँगस रॅसिमोसस ही औषधीदृष्ट्रया अतिशय महत्वाची वनस्पती आहे. पारंपरिक पद्धत बदलून नवीन पद्धत किंवा पिकांना वाव देण्याच्या दृष्टीनेही शतावरीची लागवड फायदेशीर आहे.

शतावरीच्या वंशातील ३oo पेक्षा जास्त जातींची नोंद जगभरात असली, तरी आपल्या देशात फक्त १७ जातींची नोंद आहे. त्यातील फत नऊ जाती पाहावयास मिळतात. यापैकी योग्य जातीची लागवड केल्यास औषधासाठी चांगली शतावरी उपलब्ध होईल.

रोपांची लागवड

सुरुवातीला उन्हाळ्यात तीन-चार वेळा पाऊस झाल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीस तयार केलेल्या जमिनीत ६० x ६० सेंमी अंतरावर साधारण १० ते १५ सेंमी उंच फूट आलेली रोपे लावावीत. पहिले ३-४ दिवस हलके पाणी द्यावे. त्यानंतर एक दिवसाआड दोन वेळा पाणी द्यावे. नंतर गरजेप्रमाणे ८-१o दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात झाडांचे संरक्षण करण्यासाठी, वेलीच्या बुध्याभोवती चर किंवा खड्ड्यांवर पालापाचोळा किंवा गवत टाकून आच्छादन करावे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.

शतावरी पीक या दिवसात होईल तयार 

शतावरी पीक सुमारे दीड वर्ष म्हणजे १८ महिन्यांत तयार होते. शतावरी ही महत्त्वाची औषधी वनस्पती असून  याची लागवड ही नोव्हेंबर- डिसेंबर या दरम्यान केली जाते. बिया टोकून किंवा गड्ड्याच्या फुटव्यापासून लागवड केली जाते. पांढरी शतावरी ४ बाय  ३ फूट आणि पिवळी शतावरी ३ बाय ३ किंवा ३ बाय ३ बाय २ फूट अंतरावार लागवड करावी. शतावरी लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, निचरा होणारी, हलकी, मध्यम रेताड, हलकी ते मध्यम जमीन निवडावी. ही वनस्पती उष्ण तसेच समतोष्ण  हवामानात चांगली वाढते. जमिनीची नांगरट करुन कुळव्याच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी.

१८ महिन्याच्या कालावधीत वनस्पतीची मुळ तयार होते, त्यानंतर ती वाळवावी लागते. औषधाची गुणवत्ता त्याच्या मुळावर अवलंबून असते, म्हणूनच त्याच्या लागवडीमध्ये कोणतेही दुर्लक्ष होऊ नये.  त्याच्या लागवडीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मुळ सुकल्यानंतर त्याचे वजन सुमारे एक तृतीयांश राहते.  म्हणजेच, जर तुम्ही शतावरीची १० क्विंटल उत्पन्न झाले सुकावल्यावर विक्री करताना ते फक्त ३ क्विंटल राहील.

जर तुम्ही एक एकरात शतावरीची लागवड केली तर त्यात सुमारे २० ते ३० क्विंटल उत्पादन येऊ शकते.  याची किंमत बाजारात ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत मिळेल.

महत्वाच्या बातम्या –