पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ‘या’ धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याचे जलपूजन संपन्न

जायकवाडी धरण

बीड – मांजरा धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याचे जलपूजन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे  यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी धरणातील पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. मुंडे यांनी केले.

केज तालुक्यातील धनेगाव येथे आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मांजरा धरणातील पाणीसाठ्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी आमदार संजय दौंड, पृथ्वीराज साठे, शिवाजी सिरसट, शंकर उबाळे, दत्ता पाटील, सभापती सोनवणे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, धरणातील पाणी वाया जावू नये यासाठी आवश्यक बाबी तात्काळ करण्यात याव्यात.

मांजरा धरणातून बीड सह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याची तहान भागवली जाते. मागच्या कालखंडात हे धरण कोरडे पडले होते. या धरणाच्या वरी नियमाने अनेक तलाव झाले आहेत. पाऊस काळ कमी असल्यामुळे या धरणापर्यंत पाणी येत नव्हते. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरत आले आहे.

महत्वाच्या बातम्या –