पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

यशोमती ठाकूर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळवून द्यावी – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, तसेच बियाणे न उगविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढविलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सविस्तर सर्व्हेक्षण अहवाल तयार करून नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले. मोर्शी तालुक्यातील विचोरी येथील नुकसानग्रस्त शेत शिवाराची पाहणी पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी केली, त्यानंतर आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

नागपूरसह विदर्भात पावसाने लावली हजेरी

श्रीमती ठाकूर म्हणाल्या, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विचोरी गावातील शेत शिवारात पेढी नदीचे पाणी शिरले. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे शेतीतील पेरणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राचे तत्काळ सर्वेक्षण करून पंचनामा करून नुकसानाबाबत अहवाल सादर करावे, असे स्पष्ट निर्देश महसूल प्रशासन व कृषी विभागाला त्यांनी दिले.

अज्ञातांनी द्राक्षबाग केली उद्ध्वस्त, शेतकऱ्याचे 2 एकर द्राक्षबागेचे नुकसान

सर्व्हेक्षण व्यापक स्वरूपात व्हावे, एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये, शेतकरी बांधवाना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व शेतकरी बांधवांशी  चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. खरीप हंगामात बियाणे उगवण न झाल्याच्या अनेक तक्रारी मोर्शी तालुक्यात प्राप्त झाल्या आहेत. विचोरी गावातील शेतकऱ्यांच्या सुद्धा बियाणे न उगविल्याच्या तक्रारी आहेत. सदर तक्रारी संदर्भात बियाणे कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

यासंबंधी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कंपन्यांना निर्देश दिले आहेत. भरपाईचे वाटपही होत आहे. मात्र, काही कंपन्यांकडून हयगय होत असल्यास कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

शेतकरी बांधवांना भरीव मदत मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय – कृषिमंत्री दादाजी भुसे

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 चे पिकाची नुकसान भरपाई वाटप होणार