पीक विमा योजनेच्या फायद्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे – सुनील केदार

पालकमंत्री सुनील केदार

सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे १५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावी

वर्धा – जिल्ह्यात पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कृषी विभागाने गावागावात या योजनेच्या फायद्याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. तसेच विमा कंपनीच्या  प्रतिनिधींची तालुकानिहाय नावे  आणि मोबाईल नंबर असलेली माहिती तालुकास्तरावर, गाव स्तरावर प्रसिद्ध करावी असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.

जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका टाळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मध्ये या योजनेचा लाभ शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. तथापि विदर्भात या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकरी उत्साही दिसत नाहीत. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेती पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. यासाठी या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास काही प्रमाणात तरी नुकसान  भरपाई निघू शकते. बाजार समित्यांनी या योजनेबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि या योजनेत सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच रिलायन्स विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी आणि तालुकास्तरावरील प्रतिनिधी, कार्यालयाचे पत्ते त्यांचे नाव, फोन नंबरसहित यादी तालुका आणि गाव स्तरावर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी, असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले.

शेतकऱ्यांना ‘फास्ट ट्रॅक’ मोडवर पीक कर्ज द्या – पालकमंत्री

कापूस खरेदी पूर्ण केल्याबाबत प्रशासनाचे केले अभिनंदन

विदर्भात केवळ वर्धा जिल्ह्याने सतत पाठपुरावा करून कापूस खरेदी पूर्ण केली आहे. याबाबत मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली तेव्हा वर्ध्याच्या कामाबाबत कौतुक करण्यात आले. अशी माहिती पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी दिली. तसेच या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिनिंग-प्रेसिंग, सी सी आयचे त्यांनी अभिनंदन केले.

सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे १५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सेवाग्राम विकास आराखड्यातील सर्व कामांचे लोकार्पण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून येत्या १५ सप्टेंबर पर्यंत यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

कोरोना विषाणूमुळे राज्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे सेवाग्राम विकास आराखड्यातील निधी मार्च महिन्यात परत घेण्यात आला होता. मात्र नियोजन विभागाने हा निधी पुन्हा परत केला आहे. त्यामुळे आराखड्यातील प्रलंबित राहिलेली कामे तात्काळ सुरू करून १५ सप्टेंबर पर्यंत संपवावी. त्यासाठी लागणाऱ्या सर्व मान्यता लवकरात लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची हमी श्री केदार यांनी दिली.

वस्त्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासनाचे सहकार्य – अजित पवार

काम करताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहील याची काळजी घ्या. कामाच्या गुणवत्तेत हयगय खपवून घेतली जाणार नाही. या ठिकाणी देश विदेशातील नागरिक भेट देणार आहेत. महात्मा गांधींच्या कर्मभूमीचे नाव खराब करण्याचे काम आपल्या हातून होता कामा नये असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

आर्वी देऊरवाडा रस्ता पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार असल्यामुळे तात्पुरते रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे असे निर्देश त्यांनी आमरावती विभागाच्या अभियंत्यांना दिले. पावसाळ्यात नागरिकांना अशा रस्त्याने प्रवास करताना त्रास होतो. तसेच या रस्त्यावर अपघात सुद्धा झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी खड्डे बुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

निसर्ग चक्रीवादळाने बाधित कुटुंबांना नियमांपेक्षा वाढीव दराने मदत मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार