मुंबई – ऊस गाळपासह (Sugarcane flour) साखर उत्पादनात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १७२.२५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १९७.४३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर सरासरी साखर उतारा ११.४६ टक्के इतका आहे.
राज्यातील साखर उत्पादनात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल 194 साखर कारखाने (Sugar factory) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 98 खासगी व 96 सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 194 साखर कारखान्यांकडून ७२४.९१ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल ७२९.०२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.०६ टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र असेल तरच जमा होतील ११ व्या हप्त्याचे पैसे
- चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- राज्यातील ‘या’ गावात पिकतो विदेशी काळा ऊस
- बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस – बच्चू कडू
- राज्यातील साखर उत्पादनात वाढ; आतापर्यंत ७२९.०२ लाख टन साखर उत्पादन