‘या’ जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; वित्तहानी सोबतच झाली मोठी जीवितहानी

सोलापूर-बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्रप्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला, परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. सोलापूर, सातारा, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, अनेक भाग जलमय झाले, नद्यांना पूर आले. आधीच भरलेल्या धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करावा लागला.

सोलापूर जिल्ह्यात काल दिवसभरात अनेक घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाल्याची माहिती आहे. तर शेकडो घरांची पडझड देखील झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे 80 बंधारे, पाझर तलावांना पावसाचा तडाखा बसला असल्याची माहिती आहे.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेत काल कमरेइतके पाणी साचले होते. त्यामुळं जनजीवन विस्कळित झाले आहे.

जिल्ह्यात पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. सावळेश्वर, ता. मोहोळ येथील शंकर देवकर यांच्यासह 4 जण पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. काल दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

दरम्यान,पुणे सोलापुर महामार्ग जड वाहनांना रात्रीनंतर सुरू करण्यात आला आहे. उजनि धरणातून सोडेलेल पाणी इंदापुर शहरात शिरल. निमगांव केतकी गावात पुरात अडकलेल्या 55 नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हा कमी दाबाचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्रातच असून तो उद्या कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल. त्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या किनाऱ्या लगतच्या समुद्रावरून तो उत्तरेकडे कूच करण्याची शक्यता आहे . त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या दोन दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसहीत, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होईल.

पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्याजसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर शक्यतो पडू नये. अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही आज आणि उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र आता पावसाचा जोर ओसरू लागेल. उर्वरित राज्यात17 ऑक्टोबरनंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल.

महत्वाच्या बातम्या –