मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटचा पाऊस झाला आहे. तर राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यतील अनेक गावांना अवकाळी पावसाने (Untimely rain) आणि गारपिटीने तडाखा बसला आहे. वैजापूर तालुक्यतील देवगाव ,शनि चेंडूफळ, बाजाठाण , गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा ,आणि गंगापुर मध्ये गारपीट आणि पाऊस झाला. अवकाळीपाऊस
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड आणि पैठण तालुक्यतील अनेक गावांना ही तुफान पाऊस झाला. तर राज्यातील विदर्भ भागातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्याला सळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा बसला आहे.
राज्यातील नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान विभागाचा मोठा अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांना थकबाकी मिळणार – वर्षा गायकवाड
- सर्दीसाठी एकदा करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय!
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करा – अजित पवार