Hair Care Tips | केस गळती थांबवायची असेल, तर ‘या’ टीप्स करा फॉलो

Hair Care Tips | केस गळती थांबवायची असेल, तर 'या' टीप्स करा फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या तब्येतीसोबतच आपल्या केसांकडे (Hair) दुर्लक्ष करत असतो. धूळ प्रदूषण यामुळे आपल्या केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस दिवसेंदिवस खराब होऊ लागले आहेत. त्यामुळे आपल्याला केस गळती सारखे समस्यांना सामोरे जावे लागते. केस हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असतात. कारण केसांमुळे आपल्या व्यक्तीमत्वाला एक वेगळा आकार मिळतो. त्यामुळे केस गळती ही प्रत्येकांसाठी मोठी समस्या आहे. तुम्ही या केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

केस गळती (Hair Fall) कशी थांबवायची?

तेल

केस गळती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे केसांना तेल न लावणे. तुम्हाला जर केसांची गळती थांबवायची असेल तर तुम्ही नियमितपणे  केसांना तेल लावून मालिश केली पाहिजे. त्याचबरोबर केस धुण्याआधी केसांना तेल लावले पाहिजे. तुम्ही जर नियमितपणे केस धुण्याच्या आधी केसांना तेल लावले तर तुमची केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

बीटरूट

वाढती केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही केसांना बीटरूटच्या रसाने मसाज करू शकतात. बीटरूटच्या रसाने मसाज केल्यास टाळूमध्ये रक्ताभिसरण देखील सुधारते. त्याचबरोबर केसांचे तुटणे आणि केस गळती देखील कमी होऊ शकते.

कडुलिंब

तुम्ही जर केस गळती आणि त्याचबरोबर केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यापासून त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या केसांना कडुलिंबाचे पाणी लावू शकता. यासाठी तुम्हाला कडुलिंबाचे पाने पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. हे पाणी केसांना लावल्याने केसांमधील इन्फेक्शन देखील निघून जाते. त्याचबरोबर तुम्ही तेल लावताना त्यामध्ये या पाण्याचे काही थेंब मिसळून तेल डोक्याला लावू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या