Hair Care Tips | वाढत्या पांढऱ्या केसांच्या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Hair Care Tips | वाढत्या पांढऱ्या केसांच्या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीमुळे केस लवकर पांढरे (White Hair) व्हायला लागतात. त्याचबरोबर अयोग्य आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे देखील आपल्या केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत एक केस पांढरा झाला की बाकी केस पांढरे व्हायला जास्त वेळ लागत नाही. आजकाल तरुण वयातच केस पांढरे होण्याची समस्या आणखीनच वाढत चालली आहे. वाढते प्रदूषण, चुकीच्या खाण्यापिण्याचे सवयी, जास्त ताण तणाव यामुळे देखील केस गळती आणि केसांचे पांढरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. म्हणूनच ज्यांना केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, त्यांनी सर्वप्रथम आपल्या आहारात विटामिन सी  युक्त पदार्थांचा समावेश करावा. तुम्ही पण जर पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पांढरे केस नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

पांढऱ्या केसांच्या (White Hair) समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी करा पुढील घरगुती उपाय

कढीपत्ता

कढीपत्ता नेहमी केसांसाठी खूप उपयुक्त असतो. त्याचबरोबर कढीपत्त्याचा नियमित वापराने केसांवरील पांढरेपणा नियंत्रणात आणता येऊ शकतो. कढीपत्त्याच्या वापराने केस गळती थांबू शकते. यासाठी तुम्ही कढीपत्त्याची पेस्ट करून डोक्याला लावू शकतात. त्याचबरोबर केसांना तेल लावताना तुम्ही त्या तेलामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून ते तेल कोमट करून डोक्याला लावू शकतात. तेलामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून टाळूला आठवड्यातून एकदा मसाज केल्यास तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक झाला

भृंगराज

भृंगराज ही एक केसांच्या समस्यांसाठी रामबाण आयुर्वेदिक औषध आहे. त्याचबरोबर पांढरे केस काळे करण्यासाठी भृंगराज तुम्हाला मदत करू शकते. यासाठी तुम्ही केसांना भृंगराज तेल किंवा भृंगराज पावडर वापरू शकता. भृंगराज तेल किंवा पावडर डोक्याला लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुमच्या रेगुलर शाम्पूने केस धुवा. यानंतर तुमचे पांढरे केस हळूहळू नाहीसे होतील.

आवळा

केसांमध्ये होणाऱ्या पांढरेपणा नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्ही आवळ्याचा हेयर मास्क  डोक्याला लावू शकता. आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी उपलब्ध असते. ज्याच्या मदतीने तुमचे केस काळे होऊ शकतात. तुम्ही पांढरे केस नियंत्रणात आणण्यासाठी आठवड्यातून एकदा आवळ्याचा हेअर मास्क केसांना लावू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या