गुगलने दिल्या नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा!

गुगलने दिल्या नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा! maxresdefault e1577190804846

गुगलने आज डूडलच्या माध्यमातून आपल्या युजर्सना नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने सोमवारी मध्यरात्री ‘Happy Holidays 2019’, अशा शब्दात शुभेच्छा देत गुगल डूडल सादर केले आहे. या डूडमध्ये गुगलने Google या शब्दातील ‘O’ या शब्दात अॅनिमेशन केले आहे. या ‘O’ मध्ये एक सुचीपर्णी झाडं दाखवल आहे. तसेच सांता एका गाडीत बसून आकाशाची सफर करताना दिसत आहे.

…..म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं

तसेच यातील विशेष बाब म्हणजे जेव्हा आपण गुगल डूडलवर कर्सर घेऊन जातो, तेव्हा आपल्याला ‘हॅपी हॉलिडेज 2019’, असं लिहलेलं दिसतं. तुम्ही Google.com या संकेतस्थळावर जाऊन गुगने सादर केलेले हे खास डूडल पाहु शकता. गुगल नेहमी एखाद्या दिवसाच्या निमित्ताने गुगल डूडल सादर करत असते.

बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा उद्रेक

22 डिसेंबरला गुगलने आपल्या युजर्सना नव्या ऋतुच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते. या दिवशी सर्वात जास्त लहान दिलवस आणि रात्र मोठी असते. त्यामुळे Winter Solstice च्या माध्यमातून गुगलने डुडलने या दिवसाचे महत्व पटवून दिले होते.