वडिलांच्या उमेदवारीसाठी कन्या हर्षदा देशमुख मैदानात

कुर्डूवाडी प्रतिनीधी/हर्षल बागल : माढा लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आपल्या वडिलांना उमेदवारी मिळावी यासाठी माजी आयुक्त जलपुरुष म्हणुन ओळख असलेले प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख देखील मैदानात ऊतरल्या आहेत. अनेकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी त्या सध्या करमाळा माढा तालुक्यात दौरे करीत असताना दिसत आहे.

महाराष्ट्रात जलयुक्त चळवळीचे प्रणेते म्हणुन प्रभाकर देशमुख यांची ओळख अाहे. माण खटाव तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसणारे प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याकडे तिकीट मागितले . तेव्हा पासुन माण खटाव तालुक्यातील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. माढा-करमाळा-माळशिरस तालुक्यात शिक्षण पाणी तसेच रोजगार या प्रमुख विषयावर काम करण्याची संधी द्यावी यासाठी आपण लोकसभेला इच्छुक आहे असे देशमुख यांनी सांगितले  आहे.

प्रभाकर देशमुख यांनी जो माण खटाव तालुक्यात जलयुक्त जलसंधारण आणि वाॅॅटरकप स्पर्धेचा पॅॅटर्न पुर्ण माढा लोकसभेत राबवु आणि सर्व मतदार संघाला पाणीदार करण्यासाठी माझ्या वडिलांना पक्षाने संधी द्यावी यासाठी कन्या हर्षदा देशमुख देखील सक्रिय झाल्या आहेत.

शिक्षण व कृषी क्षेत्रात देशपातळीवर अनेक पुरस्कार देखील प्रभाकर देशमुख यांनी मा. पंतप्रधान मनमोहनसिंग , नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेतले आहेत. त्यामुळे देशमुख यांना भविष्यात माढा मतदार संघातील विषयावंर काम करण्याची संधी द्यावी असे हर्षदा देशमुख यांनी करमाळा येथे बोलताना सागिंतले आहे.

माढ्याचा तिढा …म्हणून मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे : प्रभाकर देशमुख