साखरेचे दर खाली आणण्यासाठी देशपातळीवर षडयंत्र – हर्षवर्धन पाटील

पुणे: राज्यभरात साखरेचे दर घसरत असून त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे. साखरेचे दर खाली आणण्यासाठी देशपातळीवर षडयंत्र रचले जातय असा आरोप माजी सहकारमंत्री आणि साखर संघाचे संचालक हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. पुण्यातील साखर संकुल येथे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी त्यांनी साखर कारखानदारी समोरील अडचणी मांडल्या,

राज्यात सध्या ऊसाचा हंगाम सुरु असुन सात डिसेंबर अखेर २० टक्के म्हणजेच 199 लाख क्विटंल साखर तयार झाली आहे. ७५ % टक्के हंगाम अजून बाकी आहे त्यामुळे साखरेच्या उत्पादनात आणखीन वाढ होणार आहे. मात्र साखरेचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. देशभरात साखरेेचे उत्पादन जास्त होणार असुन तातडीने सरकारने साखर आयात बंद करावी. आणि निर्यातीवरील वीस टक्के शुल्क रद्द करुन ती शुन्यावर आणावी अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली आहे.

पाकिस्ता जर साखरेला अनुदान देऊन निर्यात करत असेल तर ते या देशात का होत नाही असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला आहे. साखर कारखानदारी धोक्यात असून महाराष्ट्र राज्य सहकारी साखऱ कारखाना संघाच्यावतीने मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांची भेट घेऊन समस्या मांडणार असल्याची माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.