औरंगाबाद : शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या माध्यमातून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत असलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. आधी सुभेदारी विश्रामगृह आणि नंतर हॉटेल ताज मध्ये जाऊन रविवारी रात्री गुप्त भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
एका बाजूला बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांचे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना आव्हान दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला जाधव औरंगाबादमधून लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता का शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा पुळका येतो ?- बच्चू कडू