Hatchback Car | छोट्या जागेमध्ये देखील सहज बसू शकतात ‘या’ हॅचबॅक कार

Hatchback Car | छोट्या जागेमध्ये देखील सहज बसू शकतात 'या' हॅचबॅक कार

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक ठिकाणी रस्ते नेहमी प्रचंड गर्दीने भरलेले असतात. त्यामुळे एवढ्या गर्दीतून वाहन घेऊन जाणे खूप कठीण काम असते. त्याचबरोबर मोठ्या गाड्या चालणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतात. त्यामुळे अशा परिस्थितींसाठी भारतीय बाजारामध्ये काही लहान हॅचबॅक कार (Hatchback Car) उपलब्ध आहेत. ज्या गर्दीमध्ये अरुंद रस्त्यावर
सहजपणे चालवता येतात. त्याच कारबद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

मारुती S Pro

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती एसटी मारुती S Pro ही एक छोटी हॅचबॅक कार आहे. या कारची लांबी 3565 मिमी  असून त्याची रुंदी 1520 मिमी  आहे. तर या कारची उंची 1567 मिमी आहे. त्याचबरोबर या कारचा टर्निंग रेडियस 4.5 मीटर आहे. या कारमध्ये 998cc इंजिन उपलब्ध असून ते 49Kw पॉवर आणि 89Nm टार्क निर्माण करते. या कारमध्ये स्पीड अलर्ट सिस्टीम, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, एअरबॅग, सेंट्रल लॉक इत्यादी आकर्षक फीचर्स देण्यात आलेले आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.25 लाख रुपये आहे.

मारुती अल्टो 800

मारुतीची मारुती अल्टो 800 ही कंपनीच्या स्वस्त कार पैकी एक कार आहे. शिकार 3445 मिनी लांब असून 1515 मिमी रुंद आहे. तर ही कार 4.6 मीटर टर्निंग रेडियसह बाजारात उपलब्ध आहे. सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एबीएस आणि ईबीडी, दोन एअरबॅग्ज इत्यादी आकर्षक वैशिष्ट्यांसह ही कार बाजारात उपलब्ध आहे. त्याचबरोबर या कारची CNG व्हर्जन देखील बाजारामध्ये लाँच झालेली आहे. मारुती अल्टो 800 या कारची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपये आहे.

ह्युंडाई सेंट्रो

ह्युंडाई ची ही कार शहरातील अरुंद रस्त्यावर सहज चालवता येण्यासारखी आहे. ह्युंडाई सेंट्रो या कारची लांबी 3610 मिमी असूनही कार 1645 रुंद आहे. ह्युंडाई सेंट्रो या कारचे CNG व्हर्जन देखील भारतीय बाजारामध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.89 लाख ते 6.41 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

महत्वाच्या बातम्या