राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ओमिक्रॉनचा कहर; ‘इतके’ रुग्ण आढळले

पुणे –  देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत होता. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता, मात्र आता मागील काही महिन्यात कोरोना कमी होताना दिसत होता, मात्र आता मागच्या काही दिवसात कोरोनानंतर देशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची धास्ती आहे. राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पिंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळत आहे.

पुण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात एका रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचे समोर आले आहे.

6 पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यामधील तिघे जण नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे.

दरम्यान, 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती. शनिवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा 1 रुग्ण आढळला होता, त्यानंतर प्रशासन अलर्ट झाले होते. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये 5 तर पुण्यात 1 नवा ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आता भारतात ओमिक्रॉन विषाणूची बाधा झालेले तब्बल 12 रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रोनचा प्रसार वेगाने होत असल्यानं आता राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –