‘राजगडा’ समोर बसणार १०० फेरीवाले !

फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेला महानगरपालिकेने दणका द्यायचा ठरवला आहे.मनसेच्या राजगड या कार्यालयाबाहेर आता १०० फेरीवाले बसवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.त्यामुळे फेरीवाल्यांना हुसकावून लावणाऱ्या मनसेला आता फेरीवाल्यांच्या रोजच्या कटकटीला सामोरे जावे लागणार आहे.महापालिकेने आखलेल्या फेरीवाला धोरणानुसार १४ रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने केली ‘अफू’ची शेती; दीड हजार झाले जप्त

या १४ रस्त्यांवर फेरीवाल्यांसाठी एक बाय एकच्या आकाराच्या जागा रंगवण्याचं काम सुरू झालं आहे.पालिकेने फेरीवाल्यांसाठी निवडलेल्या रस्त्यांमध्ये राजगड असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडचीही निवड केली आहे. या रोडवरील फुटपाथवर एकूण १०० फेरीवाले बसविले जाणार आहेत.त्यामुळे राजगड परिसर हा फेरीवाल्यांनी गजबजून जाणार आहे. महापालिकेत मनसेचा पूर्वी सारखा आवाज राहिलेला नाही. त्यामुळे मनसेला फेरीवाल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरताही येणार नसल्याचं चित्रं आहे.