गरज भासल्यास नियमाच्या चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार – दादाजी भुसे

अकोला : ज्या  शेतकऱ्याने पिकवलेले धान्य काही पैसे देऊन आपणास सहज उपलब्ध होते, ज्यावर आपण सधन लोक पिढय़ान्पिढय़ा वर्षांनुवर्ष आपल्या पोटाची भूक भागवतो. शेतात पिकणारे धान्य हे एकच एक शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचे भवितव्य हे पूर्णत: निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट पाहात असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने अवसान व मनोधैर्य खचू लागते.

त्यामुळे तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकरीभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जर काही गरज पडली तर नियमाच्या काही चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिली.

जिल्ह्यातील तालुक्यात घुसर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन व चर्चासत्रात ते बोलत होते. खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिली.

शेतकऱ्यांना पीक कर्ज, नाला खोलीकरण, मत्स्य शेती, तलावांचे पुनर्भरण इत्यादी कामांसंदर्भात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

तसेच घुसर येथील शेतकरी नंदलाल डहाके यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या बीजोत्पादन क्षेत्राला कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांवरील थकीत कर्ज आणि नियमित कर्ज माफ करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी शासनामार्फत उपसमिती नेमण्यात आली असून, या उपसमितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. शासनाकडून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –

मृद व जलसंधारण विभागांतर्गत नागपूर येथे मुख्य अभियंता तथा अपर आयुक्तांचे कार्यालय

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी यासाठी ‘प्रहार’चे आज राजभवनावर आंदोलन

सर्व मागासवर्गीय महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप करणार – दत्तात्रय भरणे

शिवसेनेचा उद्या विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा