Health Care | दिवसभर कोमट पाणी पिल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health Care | दिवसभर कोमट पाणी पिल्याने मिळू शकतात 'हे' आरोग्यदायी फायदे

टीम महाराष्ट्र देशा: सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिल्यावर अनेक आरोग्यदायी (Health) फायदे मिळतात, असे आपण नेहमी ऐकत असतो. कारण रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने तोंडात असलेली लाळ आणि हानिकारक बॅक्टेरिया पाण्यासोबत पोटात जातात आणि ते शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. त्याचबरोबर कोमट पाण्याचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे अनेक लोक सकाळी उठल्यावर साधे पाणी पितात. पण जर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायले, तर तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही दिवसभर देखील कोमट पाणी प्यायला, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दिवसभर कोमट पाण्याचे सेवन केल्याने पुढील आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

वजन कमी होते

तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नियमित कोमट पाणी प्यायला पाहिजे. कोमट पाण्याने चरबी कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर कॅलरीज देखील बर्न होतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही दिवसभर कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे.

पचनक्रिया सुधारते

नियमित कोमट पाण्याचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया निरोगी राहू शकते. गरम पाणी पोटातील ॲसिडचे उत्पादन नियंत्रणात ठेवते त्यामुळे पचनसंस्थेला चालना मिळते. परिणामी आपली पचनक्रिया तंदुरुस्त राहते.

किडनी चांगले काम करते

शरीरातील विषाणू पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. कोमट पाणी पिल्याने किडनीचे फिल्टरेशन सुधारते. परिणामी किडनी चांगले कार्य करते.

ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते

ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दिवसभर कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे. कारण नियमित कोमट पाण्याचे सेवन केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. त्याचबरोबर रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.

त्वचा निरोगी राहते

नियमित गरम पाणी पिल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते. शरीर डिटॉक्सिफाय झाल्यावर पेशींची दुरुस्ती व्यवस्थित होते. परिणामी तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार दिसायला लागते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या