Health Care | आवळा चूर्ण खाल्ल्याने मिळतात आरोग्याला ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: आवळा (Amla) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतो. अनेकलोक कच्च्या आवळ्याचे सेवन करतात, तर अनेकांना आवळ्याचे चूर्ण खायला आवडते. कच्चा आवळ्यापेक्षा आवळ्याची पावडर आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. कारण आवळ्याच्या चूर्णमध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी लागणारे पोषक घटक आढळून येतात. त्याचबरोबर आवळा पावडरचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था देखील निरोगी राहू शकते. आवळ्याचे चूर्ण खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. कारण आवळा चूर्णमुळे शरीरातील अनेक समस्या सहज दूर होतात. आवळा चूर्णचे सेवन केल्याने पुढील आरोग्याच्या समस्या दूर होतात.

वजन नियंत्रणात ठेवते

तुम्ही जर नियमित आवळा पावडरचे सेवन केले तर, तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. आवळा पावडर खाल्ल्याने झपाट्याने वजन कमी होते आणि त्याचबरोबर शरीर सुदृढ राहते. आवळा पावडरचे नियमित सेवन केल्याने मेटाबोलिझम सुधारते. परिणामी शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

पचन संस्था मजबूत राहते

तुम्ही जर गॅस, अपचन यासारख्या समस्याला झुंज देत असाल, तर आवळा पावडर तुमच्यासाठी एक रामबाण इलाज ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. परिणामी नियमित आवळ्याचे चूर्ण खाल्ल्याने पचन संस्था निरोगी राहू शकते.

डायबिटीस नियंत्रणात राहते

आवळ्याचे चूर्ण रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे नियमित आवळ्याच्या चूर्णाचे सेवन केल्याने डायबिटीस नियंत्रणात आणता येऊ शकते. आवळा पावडरमध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील साखरेची पातळी कमी करतात.

आवळ्याच्या चूर्णचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. पण तुम्हाला कोणताही आजार किंवा एलर्जी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आवळ्याच्या पावडरचे सेवन करू नये.

महत्वाच्या बातम्या