साथीच्या आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य खात्याचे नवीन पाऊल

साथीचे आजार

नवीन वर्षात अनेक नवीन उपक्रम आणि उपाययोजना राबवल्या जातात. नववर्षाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील आरोग्य खात्याने एक नवीन पाऊल उचलले आहे. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांतर्गत पुणे जिल्यात सर्वेक्षण सुरु करण्यात येणार आहे. 1 जानेवारी पासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.

यासाठी राज्यस्तरावर मोबाईल अॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, आरोग्य कर्मचारी गावोगावी घरी जाऊन या अॅप्लिकेशनवर माहिती अपलोड करणार आहेत. उपक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून,आठ तालुक्यात हे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तालुका आणि जिल्हा स्तरावरील माहिती एकत्र करून ती राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. तर, राज्यस्तरावरील माहिती केंद्रस्तरावर पाठवण्यात येणार आहे. अशा पद्धतीने भविष्यात आरोग्य विभागाची एकत्रित माहिती गोळा करण्यात येणार आहे.

दरवर्षी वातावरणातील बदलामुळे अनेक प्रकारचे साथीचे आजार पसरतात. पुण्याची लोकसंख्या लाखोंच्या घरात असल्यामुळे अचानक पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. त्यामुळे केंद्रसरकारने एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांची आखणी केली आहे. यामुळे मोबाईल व टॅबलेट्सचा वापर करून संपूर्ण जिल्ह्याचे सर्वेक्षण सहजपणे करणे शक्य होईल.

उपकेंद्र स्तरावर एक मोबाईल आणि टॅबलेटद्वारे आरोग्य सेवक-सेविका तसेच आशा सेविकांतर्फे गावोगावी हा सर्वेक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहे. संबंधित सर्व माहिती जमा करून ती अॅप्लिकेशनवर अपलोड करण्यात येईल. तसेच, जिओ टॅगिंगही करण्यात येईल. 4 दिवसाला 100 घरे असे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट्य असून महिन्यातून दोनदा सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. या सर्वेक्षणाचा ट्रेंड समजून घेऊन भविष्यात येणाऱ्या आजारांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत.असे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम

आरोग्यदायी पालक भाजी, जाणून घ्या पालक भाजी खाण्याचे फायदे….

पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं – आ. रवी राणा

शेतकरी मानधन योजनेच्या (पीएम-केएमवाय) नोंदणीस सुरूवात