अखेर..आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द !

आरोग्य विभाग

पुणे – सर्वजनिक आरोग्य विभागाच्या(Department of Public Health) क आणि ड गटाच्या झालेल्या परीक्षा ह्या पेपरफुटीच्या घटनेमुळे रद्द करण्यात आल्या आहे. असा निणर्य आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच आरोग्य विभाग भरती परीक्षा हि नव्याने घेणार असून दोन ते तीन महिन्यात परीक्षा होणार आहे हि परीक्षा ‘टीसीएस’ किंवा ‘एमकेसीएल’ मार्फत घेणार आहोत असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्य विभाग(Department of Public Health) ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आली होती, गट क साठी २७३९ आणि गट ड साठी ३४६६ जागा होत्या.
जवळजवळ नऊ महिने होत आले असले तरी परीक्षासंधार्बत संभ्रम होता,ठोस माहिती विद्यार्थ्यांना पोहचत नव्हती, काही विद्यार्ती निकालाकडे आस लावून बसले होते.

परीक्षांसाठी आधी अर्ज केलेले असाल तर.. पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नसेल. असे हि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –