जालना – जालना जिल्ह्यातील काजळा गावात आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) एका कार्यक्रमात उपस्तित होते,ते नेहमी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असल्याचे आपल्याला दिसत असते. गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका करत असताना जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे आरोगमंत्री राजेश टोपे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत म्हणाले कि, ‘आरोग्य भरतीचा राज्यात झालेला मोठा घोटाळा हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच केला आहे. आरोग्यमंत्री परीक्षा रद्द करण्यात आले आहे असे म्हणत नसून व निकाल हि देत नाहीये. त्यामुळे आम्ही अधिवेशनात हा विषय बाहेर काढणार असल्याचे गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) म्हणाले.
त्यांनी परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांचा विचार केला नाही. परीक्षा सेंटर देताना गोंधळ बघायला मिळाला. परीक्षा सेंटर देताना मुंबईच्या मुलांना जालनाचे सेंटर देण्यात आले. असे कुठे असते का? असा सवाल त्यांनी विचारला. न्यास कंपनी सारख्या ब्लॅक लिस्ट कंपनीला आम्ही नकार देत असून सुद्धा, न्यास कंपनीला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले. आता त्याच कंपनीने गोलमाल करत ह्यांना अडकवले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच न्यासा कंपनीचे संगनमत असून त्यांनी हा घोटाळा केला असा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar)यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या वीज कुठे पडणार? ‘दामिनी’ अँप द्वारे मिळणार माहिती!
- ग्रामीण भागात ‘तंत्रज्ञान प्रणाली’ वापरून आरोग्ययंत्रणा मजबूत करा, असे निर्दे
- खुशखबर : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन,असा करा अर्ज.
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; केंद्र सरकारने खतेविक्रीबाबत घेतला ‘हा’ मो
- राज्यात दुबारपेरणीचे संकट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई क