Health Tips | कोरड्या खोकल्यापासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Health Tips | कोरड्या खोकल्यापासून त्रस्त आहात?, तर करा 'हे' घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) सोबत घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये प्रत्येकालाच आपल्या आरोग्याची (Health) अधिक काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाला थंडीमध्ये सतर्क राहण्याची गरज असते. कारण बदलत्या हवामानासोबत सर्दी, खोकला हा सामान्य होऊन जातो. पण अशा परिस्थितीमध्ये जर कोरडा खोकला येत असेल तर त्याबरोबर घशाचा त्रास होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत लोक अनेक प्रकारच्या औषधी घेतात. पण खोकल्यावर काही विशेष परिणाम होत नाही. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे केल्यावर तुम्ही कोरडा खोकला नियंत्रण आणू शकतात.

मध

मध कोरड्या खोकल्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे मध कोरडा खोकला नियंत्रणात आणण्यास मदत करू शकतो. त्याचबरोबर मधाच्या नियमित सेवनाने चिडचिड देखील कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही गरम पाण्यात किंवा चहामध्ये एक चमचा मध मिसळून घेऊ शकतात.

संत्रा,हळद आणि काळी मिरी

कोरडा खोकला नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काळी मिरी आणि संत्र्याच्या सेवन करू शकतात. कारण यामध्ये अँटिमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात. जे खोकला बरा करण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला संत्र्याच्या रसामध्ये एक चमचा हळद मिसळून चिमूटभर काळी मिरी मिसळून ते तयार झालेले मिश्रण प्यावे लागेल. नियमित या द्रावणाचे सेवन केल्याने तुमचा कोरडा खोकला बरा होऊ शकतो.

तुप

तुप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुपामध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटीइम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. हे घटक घसा निरोगी आणि मऊ ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर तुपामध्ये काळा मिरची पावडर मिसळून खाल्ल्यास कोरडा खोकला नियंत्रणात येऊ शकतो. त्याचबरोबर कोरड्या खोकल्यामध्ये मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने देखील तुमच्या घशाला आराम मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या