Heart Care Tips | हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

Heart Care Tips | हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हृदय (Heart) निरोगी ठेवणे हे एक मोठे आव्हान झाले आहे. कारण बदलती दिनचर्या, असंतुलित आहार यामुळे आपल्या हृदयावर अनेक परिणाम होत असतात. अशा परिस्थितीत लोकांना धावपळीची सवय झाली आहे. यामुळे हृदयावर परिणाम होऊन सरळ ब्लड प्रेशर वाढू शकते. ब्लड प्रेशर वाढले तर हृदयविकार दार ठोठावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

द्राक्षे

द्राक्ष आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. द्राक्ष हे अनेक आजारांवर उपाय म्हणून काम करतात. तज्ञांच्या मते, द्राक्षामध्ये पोटॅशियम आढळते. पोटॅशियममुळे शरीरातील सोडियम नियंत्रणात राहते. परिणामी सोडियम नियंत्रणात राहिल्याने बीपी नियंत्रणात राहतो. कारण बीपी नियंत्रणात नसेल तर हृदयाविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे द्राक्षाचे सेवन केल्याने तुमचा बीपी नियंत्रणात राहून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टाळू शकतो. द्राक्षासोबतच तुम्ही हृदय निरोगी ठेवण्यासाठी मनुका ही खाऊ शकता.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आढळते. त्याचबरोबर यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक देखील आढळतात. तज्ञांच्या मते, टोमॅटोमध्ये विटामिन ई, विटामिन सी, विटामिन ई, अल्फा, बीटा, ल्युटिन इत्यादी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे नियमित टोमॅटोचे सेवन करणे हे आपल्या हृदयासाठी चांगले ठरू शकते. तुम्ही रोज टोमॅटोचे सेवन करू शकता किंवा सॅलड किंवा भाजीच्या माध्यमातून टोमॅटोचे सेवन करू शकता.

बेरी

बेरीमध्ये मुबलक प्रमाणात पेक्टिन उपलब्ध असते. ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बेरीजचे सेवन केल्याने तुम्ही हृदयरोगापासून दूर राहू शकता. कारण शरीरात खराब कॅलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाचे आजार निर्माण होतात. परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या