जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; तर ‘या’ धरणांच्या साठ्यामध्ये वाढ

धरण

औरंगाबाद – नाशिक जिल्ह्यामध्ये मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम धरणांच्या साठ्यामध्ये हळूवार वाढ होत असून, आता दारणा आणि नांदूर मध्यमेश्वरमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दरम्यान, असे असले तरीही उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याचे लक्ष लागून असलेल्या जायकवाडी धरणामध्ये अद्यापही ५५ टक्क्यांपेक्षा कमी साठा उपलब्ध आहे. मेंढेगिरी समितीचा अहवाल आणि एमडब्ल्यूआरआरएच्या नियमानुसार ६५ टक्के जायकवाडी धरण भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे अजूनही १० टक्के धरणसाठा वाढीची प्रतीक्षा लागून आहे.

मराठवाड्यासह औरंगाबादची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात ५३.५३ टक्के पाणीसाठा सध्या झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे साठा वाढल्याने पिण्याच्या आणि उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के जलसाठा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी धरणात ९८ टक्के जलसाठा होता.

महत्वाच्या बातम्या –