पुढील ४ दिवस राज्यात पुन्हा धो-धो पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

पाऊस

पुणे – सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. करण गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. रविवारी म्हणजेच आज कोकण आणि विदर्भातकाही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर सोमवारी म्हणजेच उद्या पासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

सध्या अरबी समुद्राच्या पूर्वमध्य परिसर आणि कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती महाराष्ट्राच्या किनारपट्टापर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर भारतातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण आहे. दरम्यान, उकाड्यात वाढ होत असून तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे परिसरातही काही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –